Oct 06

नवदुर्गा :: द्वितीय अवतार :: ब्रम्हचारिणी (Navadurga :: Bramhacharini)

 नवदुर्गा :: ब्रम्हचारिणी  ( Navadurga :: Bramhacharini ) 

 

दधाना कर पद्माभ्यामक्ष माला कमण्डलु |देवी प्रसीदतु मणि ब्रह्मचारिणीय नुत्तमा ||

 

नवदुर्गापैकी दुर्गेचे दुसरं रूप म्हणजे साक्षात ब्रम्हचारिणी. ह्या रूपाचे वर्णन पुढील प्रमाणे जाणवतेब्रम्हचारिणी, जी कुमारिका आहे, अविवाहिता आहे, अशी ती जिने एका हातामध्ये कमळ आणि कमंडलू धारण केले आहे नी दुसऱ्या हातामध्ये रुद्राक्षाची जपमाळ आहे. ब्रम्हचारिणी म्हणजेच प्रेम, एकनिष्ठता, ज्ञान आणि बुद्धिमत्ता ह्याचे सगुण साकार रूप आहे. ब्रम्हचारिणी हे पार्वतीचे कुमारिका स्वरूप आहे. मंगळ ग्रहावर जिचे आधिपत्य असून जी साक्षात भाग्य प्रदायीनी आहे.
ब्रम्हचारिणी ह्या पार्वतीच्या रूपबद्दल जाणून घ्यायचा असेल तर पुराणात डोकावावं लागेलच. पार्वतीच्या सती रूपाच्या अंतानंतर भगवान शंकर घोर तपसेला बसले. त्यानंतर दुर्गेनी हेमावती नावानी हिमवन ह्याची कन्या म्हणून जन्म घेतला. हे रूप धारण करण्यामागचा हेतू होता, कि भगवान शंकरांना त्यांच्या तपासेतून जागृत करून शिव आणि शक्ती ह्याचे मिलन घडवून आणायचे होते. म्हणून देवर्षी नारद ह्याच्या सांगण्यावरून दुर्गेनी भगवान शंकरांना आपल्या पतीच्या रूपात मिळवण्यासाठी घोर तपश्चर्या केली. अतिशय कठोर ध्यान कितेक वर्षं ती करत राहिली. आहारामध्ये नुसती फळे, कंदमुळे आणि पर्णयुक्त भाज्यांचा समावेश होता. एवढ्या घोर तपश्चर्येचा भागवानांवर काहीच परिणाम होत नाही म्हटल्यावर शेवटी तिने अन्न पाण्याविन उन्ह-पाउस-वादळ ह्यांची तमा न बाळगता तश्या परस्थितीत घोर तप करून अखेर भगवान शंकरांना आपल्या पतिदेवांच्या रूपात प्राप्त करून घेतले. तिलाच 'अपर्णा' असे म्हणतात. माता दुर्गेच्या अश्या घोर तपश्चर्येला सर्व देवांनी वंदन केले आणि ब्रम्हाने सांगितले इतके कठोर तप इथून पुढे कोणीच करणार नाही. आणि तिलाच ब्रम्हचारिणी हे नाव दिले. हि मंगळ ग्रहाचे आधिपत्य करते.

ब्रम्हचारिणीचे ते निरामय स्वरूप लोभस असे आहे जिनी आपल्या प्रेम, एकनिष्ठता, ज्ञान आणि बुद्धिमत्ता ह्या चारही गुणांच्या जोरावर आणि श्रद्धा आणि चिकटीनि साक्षात भगवान शंकर ह्यांना आपल्या पतीच्या रूपात वरले, त्या कौमारिका स्वरूप ब्रम्हचारिणी मातेला प्रणाम..!!

 

ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!  

This article is previously written by Arpan(myarpan.in) for Shri dattaguru Facebook Page

Date: 06 Oct 2013