Oct 12
नवदुर्गा :: आठवा अवतार :: महागौरी (Navadurga :: Mahaguri)
श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचिः | महागौरी शुभं दद्यान्त्र महादेव प्रमोददा ||
महागौरी, अमोघ शक्तींनी परिपूर्ण अशी बुद्धिमान, शांतताप्रिय, मृदू आणि भूतकाळातील पापांना नष्ट करणारी हि आदि शक्ती, आदि माता आहे. माता पार्वतीनी हिमालायामध्ये घोर तपस्या करून कांती नीलवर्ण करून घेतली होती. जेव्हा साक्षात भगवान शंकर ह्यांनी देवीला गंगेच्या पवित्र पाण्यानी स्नान घातले तेव्हा देवीची कांती पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी दिसू लागली म्हणूनच तिला महागौरी म्हणजेच गौर वर्ण धारण केलेली असे म्हणतात. महागौरी शुभ्र वस्त्र ल्यालेली असून बैलावर आरूढ आहे. त्रिनेत्रधरी आहे, चतुर्भुज असून एका हातमध्ये डमरू आणि दुसर्या हातामध्ये त्रिशूळ धारण केले आहे. ह्या रूपामध्ये पार्वती बालं-रूपात असून अविवाहित आहे. हि राहु ग्रहाचे आधिपत्य करते.
ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!
This article is previously written byArpan(myarpan.in) for Shri dattaguru Facebook Page