Oct 19

बुध ग्रहाची स्वामिनी स्कन्दा (Mercury)

बुध ग्रहाची आधिदात्री स्कन्दा (Mercury) 

 

 

पीताम्बरः पीतवपुः किरीटी चतुर्भुजो दण्डधरश्च हारी । चर्मासिधृक् सोमसुतो धनुष्मान् सिंहाधिरुढो वरदो बुधश्च ।।

 

 

   

 

राजसगुणी बुध जो मुलतः पृथ्वी ह्या तत्वापासून बनलेला आहे. बुद्धिजीवी, भाषणप्रिय, आत्मविश्वास, खेळकर वृत्ती, चातुर्य, चिकित्सा,हिशेबी, शिस्तप्रिय ह्या गुणांचा अधिपती आहे.

 

विष्णु पुराण, देवी भागवत पुराण, पद्मपुराण, ब्रम्हपुराण वायुपुराणासारख्या अनेक धार्मिक ग्रंथातून बुध ग्रहाच्या उत्पत्तीचा दाखला मिळतो. ह्या पुराणानुसार बृहस्पती (गुरु) पत्नी तारा हिच्याविषयी वाटणाऱ्या प्रलोभनातून सोम (चंद्र) आणि ताराद्वारे बुधाचा जन्म झाला.

 बुध ग्रहाची आधिदात्री स्कन्दा (Mercury)

 

 हा ग्रह कधी तटस्थ असतो तर कधी ह्याच्या विरुद्ध, त्यामुळे बुध ग्रह तारामंडळातही चंचलता दर्शवतो. बुध ग्रह व्यापारी स्वभाव, हास्य आणि बुद्धिप्रेमी, नाजुक शरीरबांधेचा असून उत्तर दिशेचे स्वामित्व करतो. अश्या ह्या द्विस्वभावी, बुद्धीकारक, विद्याकारक, जननकारक बुधाचे आधिपत्य करते दुर्गेचा पाचवा अवतार स्कन्दा माता.


 ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!  

Navagrah Image Creadits to Drdha Monge & Internet Source

Date: 19 Oct 2013