Oct 07

नवदुर्गा :: त्रितीय अवतार :: चंद्रघंटा (Navadurga :: Chandraghanta)

 नवदुर्गा :: चंद्रघंटा ( Navadurga :: Chandraghanta ) 

 

पिण्डज प्रवरारुढ़ा चण्डकोपास्त्र कैर्युता |प्रसादं तनुते मह्यं चंद्र घंष्टेति विश्रुता ||

 

आदि शक्तीचा तिसरा अवतार चंद्रघंटा माता, जी वीरता, शांती, समृद्धी आणि शाश्वत शक्तींनी परिपूर्ण आहे. तिची कांती सुवर्णाची, तेजस्वी अशी असून ती त्रिनेत्री आहे. आठ हात आणि त्या प्रत्येक हातामध्ये तिने धनुष्य, बाण, त्रिशूल, गदा, कमळ, कमंडलू , माळ अशी आयुध धारण केलेली आहेत. वाघावर आरूढ अशी तेजानी आणि शौर्यानी युक्त, लढायला तयार बसलेली अशी माता चंद्रघंटा हिचे स्वरूप आहे. तिच्या आवाजाला धार आहे, तिच्या एका गर्जनेनी सर्व असुर, वाईट शक्ती कापून उठते. ह्या दुर्गेच्या रुपाला चंद्रघंटा असे नाव पडले आहे कारण, हिने आपल्या भाळी चंद्राला धारण करून त्या चंद्राचा आकार अर्द्ध परिपत्र म्हणजेच अर्धचंद्र असून घंटे समान भासतो. चंद्रघंटा माता प्रामुख्यानी तमिळनाडू मधील कांचीपुराम येथे प्रसिद्ध आहे. आंध्रप्रदेशात तिचा भक्त परिवार मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोहि शुक्र ग्रहाचे आधिपत्य करते.  

 

ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!  

This article is previously written by Arpan(myarpan.in) for Shri dattaguru Facebook Page 

Date: 07 Oct 2013