Oct 23
केतू ग्रहाची स्वामिनी सिद्धिदायिनी (सिद्धीदात्री) (Ketu)
धूम्रो द्विवाहुर्वरदः सकेतुः मीनासनस्थः करवालपाणिः। किरीटकेयूरविभूषितो यः सदास्तु मे केतुगणः प्रशान्तः ।।
तामसगुणी केतू, अग्नी ह्या प्राकृतिक तत्वापासून बनलेला आहे. राहू ग्रहाला असुराचे मस्तक मानतात आणि केतू ग्रहाला त्याच असुराचे शेपूट. अलौकिक, मोक्षकारक असणारा केतू, आध्यात्मिक प्रवृत्ती, सांसारिक इच्छा-महत्वाकांक्षा प्रती अनासक्ति, बुद्धि, ज्ञान, आत्मबोध, प्राकृतिक चिकित्सा, तांत्रिकविद्या, चतुराई, निपुणता, दिव्यशक्ति, प्रसिद्धि, सामाजिक सम्मान, अनिश्चितता, तणाव आणि अशांति ह्यांचे प्रतीक आहे.
उत्तर पश्चिम दिशेचे स्वामित्व करणाऱ्या अश्या केतू ग्रहाचे नियंत्रण करते, दुर्गेचा नववा अवतार माता सिद्धिदायिनी (सिद्धीदात्री).
ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!
Navagrah Image Creadits to Drdha Monge & Internet Source