Oct 13
नवदुर्गा :: नववा अवतार :: सिद्धिदायिनी (सिद्धीदात्री) (Navadurga :: Siddhidatri)
सिद्ध गन्धर्व यज्ञद्यैर सुरैर मरैरपि | सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धि दायिनी ||
शांत, सगुण, निरामय स्वरूप म्हणजे सिद्धिदायिनी माता. जी असुर मर्दन करून कमळावर बसली आहे. प्रसन्न मुद्रेनी योगी, महायोगी, ब्राम्हण, देव, दानव, गंधर्व आणि समस्त पृथ्वीवरील सर्व भक्तांना आपल्या छत्रछायेत आधार देऊन तिच्या अशिषाने सर्वांना सुखावित आहे. कमळावर आसनस्थ बसून देवी तिचा कृपाशीर्वाद सर्वांना देत आहे. सिद्धिदायिनी चतुर्भुज असून तिने हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि कमळ धारण केले आहे. स्वतः भगवान शिव जिची आराधना करून जिला आपल्या मध्ये सामावून घेतले आणि 'अर्धनारीनटेश्वर' ह्या रूपामध्ये दर्शन दिले तीच हि सिद्धिदायिनी माता. हि केतु ग्रहाचे आधिपत्य करते.
असा हा स्त्री शक्तीचा महिमा आपण सर्वांनी नऊ दिवस वाचला आणि ३६५ दिवस आपण तो अनुभवतो, आपल्या मातेच्या रूपात, बहिणीच्या रूपात, बायकोच्या रूपात, मुलीच्या रूपात. संपूर्ण विश्व हे शिव आणि शक्ती ह्या दोनही असीम तत्वांवर शाश्वत आहे. तेव्हा शिव आणि शक्तीला मनोभावे प्रणाम करून त्या शक्तीचा आदर करूया.
ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!
This article is previously written by Arpan(myarpan.in) for Shri dattaguru Facebook Page