Oct 21
शनि ग्रहाची स्वामिनी कालरात्री (Saturn)
नीलाम्बरः शूलधरः किरीटी गृध्रस्थितस्त्रासकरः सशस्त्रः । चतुर्भुजो सूर्यसुतः प्रशान्तः सदास्तु मह्यं वरदोल्पगामी ।।
मार्कंडेय पुराणानुसार सूर्य आणि त्याची पत्नी छाया ह्यांचा पुत्र, पश्चिम दिशेचा स्वामी जो वायु तत्वापासून निर्मित आहे आणि तो तमोगुणी आहे, असा तो शनि ग्रह ज्याला शनैश्चरा (ज्याची गती हळू आहे) म्हणूनही संबोधतात. त्याला कालरात्री माता नियंत्रित करते.
शनि ग्रह मनुष्याच्या जेव्हा योग्य घरात असतो तेव्हा अनुशासन आणि व्यवस्था, गंभीरता, परिश्रम, करूणा, दीर्घायु, विवेक, अर्थव्यवस्था, परिवर्तन, धैर्य, अखंडता, ज्ञान, अध्यात्म, प्रसिद्धि, अधिकार, संगठनाक्षमता, न्यायप्रिय आणि सतर्कता ह्या गुणांचा लाभ होतो परंतु शनि ग्रह मनुष्याच्या अयोग्य घरात असतो तेव्हा रूढ़िवाद, हिंसा, भय, पीडा,दुखः, बाधा, विवाद, निराशा, कठीण परिस्थिती अश्या गोष्टींना सामोरे जावे लागते.
ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!
Navagrah Image Creadits to Drdha Monge & Internet Source