Oct 09

नवदुर्गा :: पाचवा अवतार :: स्कन्दा (Navadurga :: Skanda)

नवदुर्गा :: स्कन्दा ( Navadurga :: Skanda ) 

 

सिंहासना गता नित्यं पद्माश्रि तकरद्वया | शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी ||

 

आज ललिता पंचमी. भगवान कार्तिकेयला असुरांचा नाश करण्यासाठी योजले होते, आणि भगवान कार्तिकेय म्हणजेच 'स्कन्द' आणि त्याची जननी म्हणजेच पार्वती म्हणजेच 'स्कन्दा', दुर्गेचा पाचवा अवतार. हि वाघावर आपल्या छोट्या बालकासह बसलीये. चतुर्भुजा असून दोन हातांमध्ये कमळ आहे, एका हातानी कार्तिकेयाचा हात पकडून जणू ती असुरांना मारण्याचे पेच त्याला समजावतीये. त्रिनेत्र धरी स्कन्दा माता उज्वल कांतीची असून वाघावर बसलेली आढळते. स्कन्दा हे मातृत्व, प्रेम, माया, जिव्हाळा, शांती आणि समृद्धीचे प्रतिक आहे. तिला अग्नीची देवता म्हणूनही संबोधण्यात येते. धर्माचा मार्ग सांगणारी हि स्कन्दा माता तिच्या भक्तांचे वाईट शक्तिंपासून सदैव रक्षण करतेहि बुध ग्रहाचे आधिपत्य करते.  

 

ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!  

This article is previously written by Arpan(myarpan.in) for Shri dattaguru Facebook Page

Date: 09 Oct 2013