Oct 11
नवदुर्गा :: सातवा अवतार :: कालरात्री (Navadurga :: Kalratri )
वाम पादोल्ल सल्लोहलता कण्टक भूषणा |वर्धन मूर्ध ध्वजा कृष्णा कालरात्रि भर्यङ्करी ||
आज नवरात्रीची सातवी माळ. रुद्र रूप धारण करून कालरात्री माता असुर, भूत, पिशाच्च आणि वाईट शक्तीचा नाश करायला सज्ज आहे. कालरात्री माता जी मुक्तकेशी आहे. जिचा वर्ण काळा असून ती चतुर्भुजा आहे. स्कंद पुराणामध्ये माता पार्वतीची सुवर्णकांती मुक्त होऊन तिने नीलवर्ण म्हणजे कालरात्रीचे रूप धरण केल्याचा उल्लेख आढळतो. विनाशाचे प्रतिक असलेल्या कालरात्री मातेने तिच्या एका हातामध्ये धारधार असे शस्त्र धारण केलं आहे आणि दुसर्या हातामध्ये कट्यार. अतिशय भयंकर स्वरूप धारण केलेली तेजस्वी देवी कालरात्री हि त्रिनेत्री आहे. गाढवावर जी स्वर होऊन भयमुक्तपणे संचार करतीये. दैत्यांचा विनाश करायला तयार झालेली हि कालरात्री माता 'शुभंकारी ' म्हणजेच सर्व शुभ करणारी म्हणूनही ओळखली जाते. जी भक्तांच्या सौरक्षनार्थ रौद्र रूप धारण करून अवतरली आहे. अंधःकाराचा आणि अज्ञानाचा नाश करणारी हि देवी आहे. हि शनि ग्रहाचे आधिपत्य करते.
ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!
This article is previously written by Arpan(myarpan.in) for Shri dattaguru Facebook Page