Oct 14
नवदुर्गा :: नवग्रहांची आधिदात्री (Navadurga :: Ruling 9 Planets)
तारकामंडळ हे ग्रहांना सामाऊन बनलेले क्षेत्र आहे. त्यात अनेक तारे, ग्रह त्यांच्या निहित मार्गक्रमण पथातून प्रवास करीत असतात. भौगोलिक दृष्ट्याच नव्हे तर, वैदिक दृष्ट्याही हे तारे, ग्रह मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहेत. आणि अश्या ह्या ग्रहांचे आदिशक्ती दुर्गा तिच्या नऊ रूपांमध्ये आधिपत्य करते, त्यांना ऊर्जा प्राप्त करून देते.
ह्या नवग्रहांना स्वतःचे असे प्राकृतिक गुणधर्म आहेत. सत्व, राजस आणि तमो गुणात ह्या ग्रहांचे विभाजन झाले आहे. आणि ते सुचारूपणे कार्यरत ठेवण्याचे काम नवदुर्गा करतात.
नवग्रह आणि त्यांचे प्राकृतिक स्वभाव ::
- सत्व गुण :: सूर्य (Sun), चंद्र (Moon) आणि गुरु (Jupiter)
- राजस गुण :: बुध (Mercury) आणि शुक्र (Venus)
- तमास गुण :: मंगळ (Mars), शनि (Saturn) , राहू (Rahu) आणि केतू (Ketu)
ज्याप्रमाणे नवग्रहांचे प्राकृतिक गुणधर्म महत्वाचे असतात त्याचप्रमाणे, नवग्रह हे पाच पैकी कोणत्या ना कोणत्या तत्वाने बनलेले असतात.
नवग्रह आणि त्यांची पाच प्राकृतिक तत्वे ::
- पृथ्वी :: बुध (Mercury)
- वायू :: शनि (Saturn) आणि राहू (Rahu)
- आकाश :: गुरु (Jupiter)
- जल :: चंद्र (Moon) आणि शुक्र (Venus)
- अग्नी :: सूर्य (Sun), मंगळ (Mars) आणि केतू (Ketu)
ह्या नवग्रहांनां ऊर्जा प्राप्त करून देण्याचे आणि ह्या ग्रहांचे कार्य सुचारू पद्धतीने कार्यान्वित करण्याचे महत्वाचे कार्य ह्या नवदुर्गा करतात. हे नवग्रह ह्या नवदुर्गांच्या अधिपत्याखाली येतात.
नवग्रह आणि त्यांची स्वामिनी ::
- शैलपुत्री :: चंद्र (Moon)
- ब्रम्हचारिणी :: मंगळ (Mars)
- चंद्रघंटा :: शुक्र (Venus)
- कुश्मंदा :: सूर्य (Sun)
- स्कन्दा :: बुध (Mercury)
- कात्यायिनी :: गुरु (Jupiter)
- कालरात्री :: शनि (Saturn)
- महागौरी :: राहू (Rahu)
- सिद्धिदायिनी (सिद्धीदात्री) :: केतू (Ketu)
ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!