Nov 29
माता आदि पराशक्ती :: कल्याणकरी (Welfare) स्वरूप
कल्याण्यै प्रणता वृद्धयै सिद्धयै कुर्मो नमो नमः ।
नैर्ऋत्यै भूभृतां लक्ष्म्यै शर्वाण्यै ते नमो नमः ॥३॥
अर्थ :: आम्ही त्या देवीला नमन करतो जी कल्याणकरी महान स्त्रोत बनून अवतरली आहे. जी संपूर्ण ब्रम्हांडाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करते, आमचे पालन करते, अश्या त्या दिव्यतम देवीला शतशः नमन. अश्या त्या देवीला जी पृथ्वीला तिच्या मायेचा आश्रय देते, पण प्रसंगानुरूप ती संहारक बनून विनाश करते. ह्या शिवपत्नीला जी सृजन-निर्वाह आणि 'लय' ह्या सृष्टी कार्यात अर्धांगिनी बनून कार्य करते तिला माझा नमस्कार असो.
ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!