Oct 08
नवदुर्गा :: चौथा अवतार :: कुश्मंदा (Navadurga :: Kushmanda)
सूरा सम्पूर्ण कलशं रुधिरा प्लुतमेव च | दधानां हस्त पदमयां कूष्माण्डा शुभदास्तु मे ||
नवरात्री मधली चौथी माळ. आज कुश्मंदा मातेचे पूजन करतात. कुश्मंदा माता दुर्गेचा चौथा अवतार. जी वाघावर स्वार झालीये, आठ हातांनी युक्त आणि बाण, धनुष्य, तलवार, चक्र, गदा, कमळ, पवित्र कलश आणि कमंडलू धारण केले आहे. जिने आपल्या कोमल हास्यछाटेने संपूर्ण सृष्टीला अंधकारातून बाहेर काढून सूर्यकिरण पसरावेत तसे तिच्या मायेच्या प्रकाशनी उजळून टाकले आणि विश्वाची रचना केली अश्या त्या कुश्मंदा मातेला सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती अश्या तीनही देवींचे स्वरूप मानले जाते. म्हणूनच तिला 'आदि स्वरूप माता' असाही म्हणतात. तिला 'कृष्णमंदा' ह्या हि नावानी संबोधलं जाते. तिची कांती सूर्याप्रमाणे तेजस्वी असून प्रचंड आग आणि प्रचंड तेज झेलण्याची तिची शक्ती आहे. पुराणामध्ये ह्याचा उल्लेख सापडतो कि कुश्मंदा मातेला भोपळा प्रिय असल्यानी तिला भोग म्हणून भोपळ्याचा नैवेद्य दाखवतात. त्या नैवेद्याला 'कुशमंदम' असे संबोधले जाते आणि त्या नैवेद्याच्या चाहतीला म्हणजेच देवीला 'कुश्मंदा माता' म्हंटले जाते. कुश्मंदा मातेने सूर्यमालेला जन्म दिला आणि ती सूर्यलोकाची स्वामिनी झाली. कुश्मंदा मातेच्या स्मरणाला, पूजेला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. कुश्मंदा मातेचे स्थान अनाहत चक्रामध्ये आहे त्यामुळे योगी- महायोगी तिची उपासना करतात. कुश्मंदा मातेच्या स्मरणाने अंधकार नाहीसा होऊन निर्मळ ज्ञानप्राप्ती होते. हि सुर्य ग्रहाचे आधिपत्य करते.
ॐ शांती..!!! जगदंब, जगदंब..!!!
This article is previously written by Arpan(myarpan.in) for Shri dattaguru Facebook Page